Vinfast VF6 AND VF7 info in Marathi

Vinfast VF6 AND VF7 info in Marathi : भारत ही जगातील चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था बनली. येथील बाजारपेठ देखील मोठी असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांना नेहमी खुणावत असते. अलीकडेच व्हिएतनामची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी विनफास्ट यांनी गुजरात येथील सुरत मध्ये भारतातील पहिले शोरूम उघडले व त्यानंतर चेन्नई येथे सर्वात मोठे आउटलेट उघडले असून संपूर्ण भारतभर 30 ते 35 शोरूम उघडण्याचा कंपनीचा मानस आहे, अशी कंपनीच्या प्रतिनिधींनी घोषणा केली.

Vinfast VF6 AND VF7 info in Marathi
Vinfast VF6 AND VF7 info in Marathi

Vinfast VF6 AND VF7 info in Marathi

व्हिएतनामच्या या Vinfast कंपनीने दोन प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लॉन्च केल्या आहेत, त्यांच्या व्हीएफ सिरीज मधील व्ही एफ 6 आणि व्ही एफ 7 या मॉडेल्सचा समावेश आहे. तसेच चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी भारतातील इतर कंपन्यांसोबत भागीदारी करून काम सुरू केले आहे. VF 6 आणि VF 7 या दोन मॉडेल्सची प्री बुकिंग ही भारतात 15 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे 21000 रुपयांचे टोकन भरून प्रि बुकिंग करता येते. भारतात उघडलेल्या या प्लांट मधून दरवर्षी दीड लाख वाहनांचे लक्ष विन फास्टने ठेवले आहे.

VF6 AND VF7 Booking

VF3, VF6, VF7, VF8 आणि VF9 इत्यादी मॉडेल हे भारतात विन फास्ट मार्फत लॉन्च केले जाणार आहेत. यापैकी VF6 आणि VF7 या मॉडेल्सची प्रीत बुकिंग चालू झाली असून अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे. 21000 रुपये देऊन तुम्ही प्रि बुकिंग करू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

VF6 AND VF7 Colour Options

  • Infinity Black
  • Crimson Red
  • Jet Black
  • Desat Silver
  • Zenith Grey
  • Urban Mint

VF6 AND VF7 Features

Battery Pack & Range

VF 6 आणि VF 7 या दोन मॉडेल्स मध्ये तुम्हाला 70.8 Kwh -75.3Kwh बॅटरी पॅक ऑफर करण्यात येतो. जो एका सिंगल चार्ज वर 399 ते 450 किमी ची रेंज देतो.

टेस्ला ने भारतातील पहिले शोरूम मुंबई येथे केले सुरू.

Electric Motor

तसेच यामधील इलेक्ट्रिक मोटर ही 174 बीएचपी पॉवर आणि 250 एन एम टॉर्क जनरेट करते.

Other Features

19 इंच अलॉय व्हील, लेवल टू अडास (Level 2 ADAS System), कनेक्टेड कार, कलर हेड अप डिस्प्ले, ऑल एलईडी लाइटिंग सेटअप, ड्युअल दोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटर फ्रंट सीट्स, विगन लेदर ड्यूअल टोन इंटेरियर, पॅनोरमिक ग्लास रूफ, रि जनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम इत्यादी पिक्चर्स विन फास्ट कडून ऑफर करण्यात येतात.

Vinfast VF6 AND VF7 Price in India

VF 6 (अंदाजे किंमत) 18 ते 25 लाख

VF 7 (अंदाजे किंमत) 25-30 लाख

Vinfast VF6 AND VF7 Competitors in India

व्ही एफ 6 आणि व्ही एफ 7 ची भारतीय बाजारपेठेत स्पर्धा ही थेट या Kia Carens Clavis Ev, BE6, XEV 9e TATA Harrier ev यांच्यासोबत असेल. अलीकडेच टेस्लाने देखील भारतात एन्ट्री केल्याने इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. पण Tesla कार्स दुसऱ्या देशात मॅन्युफॅक्चर करून भारतात इम्पोर्ट करून विकत असल्याने किमतीमध्ये import duty अधिक द्यावी लागत असल्याने कार ची किंमत ही जवळ जवळ दुप्पट होते.विन फास्ट ने भारतातच मॅन्युफॅक्चर प्लांट टाकल्याने Vinfast VF6 AND VF7 च्या किमती स्पर्धात्मक ठेवण्यास कंपनीला मदत होईल.

कियाने जगभरात लॉन्च केला त्यांचा दमदार Kia Tasman

रेंज रोवर सारखे फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top