TATA Harrier ev Marathi information : अलीकडेच टाटा ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह कंपनी बनली. टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्सने ईव्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतातील सगळ्यात पाॅवरफुल हॅरियर ईव्ही लॉन्च केली आणि इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रामध्ये इतर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभे केले.
भारतात टाटा मोटर्सच्या अनेक कार्स तसेच व्यावसायिक वाहने रस्त्यांवर धावतात. टाटा मोटर्स आपल्या वाहनांच्या बिल्ड क्वालिटी साठी ओळखली जाते. सदर लेखामध्ये टाटा हॅरियर ईव्हीचे फीचर्स, किंमत, व्हेरियन्ट, ड्रायव्हिंग रेंज आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती घेऊ.

TATA Harrier ev Marathi information
TATA Motors ची हॅरियर ईव्ही ही भारतीय बाजारपेठेत 3 जून 2025 रोजी लॉन्च झाली असून तचे बुकिंग 2 जुलै पासून सुरू होईल
फिचर्स
रोड प्रेझेन्स
टाटा हॅरियर ईव्ही चे डिझाईन नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्ट सारखेच असून फ्युचरिस्टिक आणि एरोडाइनॅमिक आहे, समोरील बाजूस एलईडी हेडलाईट, डी आर एल, फॉग लॅम्प संपूर्ण सेटअप हा एलईडी ऑफर करण्यात आला आहे. तसेच 18 इंच डायमंड कट आलॉय व्हिल्स आणि एकंदर लुक गाडीचा रोड प्रेझेन्स अनोखा करून टाकतो.
ऑल व्हील ड्राईव्ह
TATA Motors ने नवीन टाटा हॅरियर ईव्ही मध्ये QWD 4*4 Quad Wheel Drive हे नवीन फीचर देऊन भारतातली पहिली ऑल व्हील ड्राईव्ह ईव्ही लॉन्च केली आहे. यामुळे टाटा हॅरियर ही इतर इलेक्ट्रिक व्हेईकल पेक्षा अधिक सामर्थ्यशाली ठरते. ऑल व्हील ड्राईव्हमुळे ऑफ रोडिंग अधिक आरामदायी होते. टाटा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान QWD हे लोकांच्या आकर्षणाचा विषय बनले आहे. कारण भारतातील पहिलीच 4*4 इलेक्ट्रिक व्हेईकल यांच्या भेटीस येत आहे. टाटा हॅरियर ईव्ही हे भारतातली एकमेव इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे ज्यामध्ये ऑल व्हील ड्राईव्ह सेटअप मिळतो.
सुरक्षा
टाटा मोटर्स इलेक्ट्रिक हॅरियर मध्ये 6 एअरबॅगसह फाईव्ह स्टार सेफ्टी ऑफर करते. याशिवाय ADAS, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन EBD, ब्रेक असिस्ट, अँटीलॉक ब्रेक सिस्टीम ABS, चाइल्डसेफ्टी लॉक, सेंट्रल लॉक सिस्टीम, नाईट रियर व्ह्यू मिरर, स्पीड अलर्ट, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, चाइल्ड सीट माउंट सह, हिल डिसेंट कंट्रोल, 540° व्ह्यू कॅमेरा असे अनेक सुरक्षेचे फीचर्स टाटा हॅरियर मध्ये ऑफर करण्यात आले आहेत.
बॅटरी पॅक
टाटा हॅरियर ईव्ही मध्ये प्रामुख्याने दोन बॅटरी पॅक टाटा ऑफर करते, यामध्ये 65 किलोवॅट आणि 75 किलोवॅट असं दोन बॅटरी पॅक टाटा मोटर्स ऑफर करते. यासाठी चार्जिंग टाईम हा 20-80% चार्जिंग अवघ्या 25 मिनिटात होते. त्यामध्ये फास्ट चार्जिंग फीचर्स ऑफर करण्यात आला आहे. टाटा मोटर्स या बॅटरी पॅक वर लाईफ टाईम वॉरंटी ऑफर करते. जी ग्राहकांची कंपनी वरील विश्वासार्हता वाढवते.
ड्रायव्हिंग रेंज Tata Harrier ev Driving Range
नवीन टाटा हॅरियर मध्ये 65 किलो वॅट आणि 75 किलो वॅट असे दोन बॅटरी पॅक ऑफर करण्यात आले आहेत तसेच टाटा हॅरियर ही एका चार्ज मध्ये 627 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. यामुळे तुम्ही एका चार्जवर पुण्याहून नागपूर पर्यंत चा प्रवास / मुंबईहून गोव्यापर्यंत प्रवास सिंगल चार्ज मध्ये करू शकता.





किंमत Tata Harrier ev Price And Varient
नवीन 4*4 टाटा हॅरियर ची किंमत आहे 21. 49 लाखांपासून सुरू होते. टाटा हॅरियर ईव्हीची सुरुवातीची किंमत 21.49 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही किंमत बेस व्हेरिएंटसाठी आहे, ज्यामध्ये 65 kWh बॅटरी पॅक समाविष्ट आहे तर टॉप व्हेरिएंटची किंमत ₹30.23 लाखांपर्यंत जाते, ज्यामध्ये अनेक फीचर्स ऑफर केले जातात.
व्हेरिएंट्स TATA Harrier ev Marathi information
| Tata Harrier EV Adventure 65 | 21.49 Lakh* |
| Harrier EV Adventure 65 ACFC | 21.98 Lakh* |
| Harrier EV Adventure S 65 | 21.99 Lakh* |
| Harrier EV Adventure S 65 ACFC | 22.48 Lakh* |
| Harrier EV fearless Plus 65 | 23.99 Lakh* |
| Harrier EV Plus 65 ACFC | 24.48 Lakh* |
| Harrier EV fearless Plus 75 | 24.99 Lakh* |
| Harrier EV fearless Plus 75 ACFC | 25.48 Lakh* |
| Harrier EV Empowerer 75 | 27.49 Lakh* |
| Harrier EV Empowered 75 ACFC | 27.98 Lakh* |
| Harrier EV Empowered 75 stealth | 28.24 Lakh* |
| Harrier EV Empowered 75 stealth ACFC | 28.73 Lakh* |
| Harrier EV Empowered QWD 75 | 28.99 Lakh* |
| Harrier EV Empowered QWD 75 ACFC | 29.48 Lakh* |
| Harrier EV Empowered QWD 75 stealth | 29.74 Lakh* |
| Harrier EV QWD 75 stealth ACFC | 30.23 Lakh* |
स्पर्धा Tata Harrier ev competitors
टाटा टाटा हॅरियर ईव्हीची स्पर्धा ही महिंद्रा एक्स यु व्ही 700 इलेक्ट्रिक, महिंद्रा बीई 6, बाईड अट्टो 3, हुंडाई क्रेटा ईव्ही यांच्याशी असेल. पण टाटा मोटर्सने ऑफर केलेले फीचर्स पाहता Tata Harrier ev मुळे बाजारातील इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.