Tesla Model Y info in Marathi

Tesla Model Y info in Marathi : बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर टेस्ला ने त्यांचे भारतातील पहिले शोरूम बीकेसी मुंबई येथे सुरू केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

Tesla Model Y info in Marathi
Tesla Model Y info in Marathi

दिल्ली येथे देखील लवकरच टेस्ला शोरूम सुरू करणार आहे. यामुळे मुंबईसह दिल्ली मध्ये देखील आता टेस्ला कार खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टेस्ला कार अमेरिकेत लॉन्च झाल्यानंतर बराच गाजावाजा झाला होता. काही भारतीय उद्योजकांनी त्याच वेळेस टेस्ला खरेदी करून भारतात इम्पोर्ट केल्या होत्या.

आता टेस्ला कंपनीने भारतातील ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इंट्री केली आहे. सध्या टेस्ला मॉडेल वाय (Tesla Model Y) ची बुकिंग कंपनीने भारतात सुरू केली आहे. तसेच त्याची डिलिव्हरी ही सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये मिळेल कंपनीकडून सांगण्यात आले आहे. टेस्ला कंपनीने सध्या भारतात फक्त दोन मॉडेल लॉन्च केले आहेत.

टेस्ला कंपनीचे उत्पादन सध्या भारतात चालू नसल्याने कार्स चीन मधून इम्पोर्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे भारतात या कारची किंमत 60 ते 65 लाखांच्या घरात असणार आहे.

सदर लेखांमध्ये आपण टेस्टला मॉडेल वाय ची संपूर्ण माहिती घेऊ.

Tesla Model Y info in Marathi

टेस्ला मॉडेल वाय चे दोन व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रियर व्हील ड्राईव्ह आणि लॉंग रेंज रियर व्हील ड्राईव्ह हे दोन व्हेरियंट सध्या भारतात उपलब्ध आहेत.

फिचर्स Tesla Model Y Features

टेस्ला ने लॉन्च केलेल्या या मीड साईज एसयूव्हीमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स साठी अनेक सुरक्षा फीचर्स ऑफर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने एअर बॅग, ADAS System, लेन असिस्ट, ABD, ABS, ऑटो पायलट, पॅनारॉमिक ग्लास रूफ, व्हेंटिलेटड सीट्स, ड्युअल झोन क्लाइमेट कंट्रोल, फोल्डेबल रिअर सीट्स, डॉग मोड, कॅम्प मोड, तिथला आर्केड, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, 360° कॅमेरा, उत्तम बॅटरी कॅपॅसिटी, आणि सुपर चार्ज टेक्नॉलॉजी इत्यादी.

उपलब्ध रंग Tesla Model Y Colours

पर्ल व्हाइट मल्टीकोट, डायमंड ब्लॅक, अल्ट्रा रेड, डीप ब्लू मेटॉलिक, स्टेल्थ ग्रे, सिल्वर इत्यादी रंगांचे पर्याय टेस्ला कडून ऑफर करण्यात आले आहेत.

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज Tesla Model Y battery & Driving Range

टेस्ला मॉडेल वाय मध्ये 60kWh, 75kWh असे दोन बॅटरी पॅक ऑफर करण्यात आले आहे जे नवीन तंत्रज्ञानावर आधारित असून अधिक रेंज देण्यास सक्षम आहेत. यामुळे टेस्ला मॉडेल वाय हे 600-622 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते.

किंमत Tesla Model Y Price in India

टेस्ला मॉडेल वाय चे दोन व्हेरियंट भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची किंमत साधारण 60 लाखांपासून सुरू होते. तसेच ही किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते.

हे देखील वाचा- रेंज रोवर सारखे फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

स्पर्धा

टेस्ला मॉडेल वायची स्पर्धा ही थेट टाटा मोटर्स, बी वाय डी, किया, मर्सिडीज यासह इतर इलेक्ट्रिक ब्रँड सोबत असेल. टेस्ला मधील आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितता यामुळे ती भारतीय बाजारातील इतर स्पर्धकांना चांगलीच टक्कर देऊ शकते.

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या – www.tesla.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top