Kia Tasman

Kia Tasman Launch Globally किआ टॅस्मन होणार जागतिक लाँच

भविष्यात ऑफ रोडींग ही अधिक सुखकर आणि अधिक आरामदायी असणार आहे. किआ मोटर्सने आपल्या नवीन टॅस्मन पिक-अप ट्रकच्या माध्यमातून जागतिक ऑटो मोबाईल सेक्टर मध्ये धुमाकूळ घातला आहे ! हा ट्रक फक्त एक वाहन नसून, अगदी शेतकऱ्यांपासून ते बांधकाम क्षेत्रातील कामगारांपर्यंत सर्वांच्या कामासाठी तसेच अगदी ऑफ रोडींग पासून रेग्युलर वापरास उपयुक्त आहे.

Kia Tasman
Kia Tasman

चला, या अद्भुत ट्रकच्या जागतिक लाँचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

किआ टॅस्मनची जागतिक लाँच Kia Tasman Launch globally

विविध देशांमध्ये लाँचचे नियोजन किआ मोटर्सने केले आहे 2025 च्या पहिल्या सहामाहीत Tasman जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. दक्षिण कोरियामध्ये ही ट्रक मे 2025 मध्ये लाँच होणार आहे, तर ऑस्ट्रेलियामध्ये जुलै 2025 पासून ड्युअल कॅब पिक-अप मॉडेल्स उपलब्ध होतील. ऑस्ट्रेलियामध्ये ड्युअल कॅब चेसिस मॉडेल्स ऑगस्ट 2025 मध्ये आणि सिंगल कॅब चेसिस मॉडेल्स 2025 च्या उत्तरार्धात लाँच केले जातील. त्याचबरोबर, मध्य पूर्व देशांमध्ये ही ट्रक 2025 मध्ये आणि न्यूझीलंडमध्ये ऑगस्ट 2025 पासून उपलब्ध होईल.

अद्याप भारतात किआ टॅस्मनच्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

परंतु, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील लॉन्च नंतर हा ट्रक भारतातही लवकरच जून २०२६ पर्यंत दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

Kia Tasman
Kia Tasman

किआ टॅस्मनची मुख्य वैशिष्ट्ये Kia Tasman Features

इंजिन आणि परफॉर्मन्स

किआ टॅस्मनमध्ये 2.2-लीटर चार-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन दिले आहे, जो 154 kW पॉवर आणि 440 Nm टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अत्यंत सुखदायी आणि शक्तिशाली बनतो. ऑस्ट्रेलियामध्ये ही ट्रक मध्य-2025 मध्ये लाँच होणार आहे आणि त्यात फक्त चार-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिनच पर्याय उपलब्ध असेल. काही बाजारात 2.5-लीटर 4-सिलिंडर इंजिनचाही पर्याय असेल, जो वेगवेगळ्या गरजांनुसार अनुकूलित केला जाईल.

सुरक्षा आणि तंत्रज्ञान

किआ टॅस्मनमध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्ट सिस्टम (ADAS), मल्टी-ॲँगल कॅमेरा आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम (ABS) यांचा समावेश आहे. ही ट्रक फक्त कार्यक्षमतेवर भर देत नाही, तर ड्रायव्हर आणि को पॅसेंजर यांच्यासाठी देखील पुरेशी सुरक्षितता प्रदान करतो. क्रॅश टेस्टमध्ये देखील 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

किआ टॅस्मन का खास आहे?

आधुनिक डिझाईन आणि शार्प कटस् किआ टॅस्मन ला पूर्णतः वेगळे बनवतात. चांगली ऑफ रोडिंग कॅपॅसिटी, दमदार परफॉर्मन्स, उत्तम ग्राउंड क्लिअरन्स, आवश्यक असलेले सर्व फीचर्स यामध्ये ऑफर करण्यात आले आहेत. विशेषता कॅम्पिंग आणि ऑफरोडिंग करणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात आला आहे. किआ टॅस्मन ची स्पर्धा ही थेट टोयोटा हायलक्स आणि इसुझू यांच्या सह असेल. तज्ञांच्या मते, किआ टॅस्मन या ट्रकची डिझाइन आणि कार्यक्षमता इतकी उत्तम आहे की, ऑस्ट्रेलियापासून ते आफ्रिकेपर्यंत सर्व बाजारांमध्ये यश मिळवेल.

Kia Tasman India Launches and Price

टॅस्मनची जागतिक लाँचिंग ही फक्त एक नवीन वाहनाची सुरुवात नसून, कार्यक्षमता आणि स्टाइलच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. हा ट्रक जून 2026 पर्यंत सर्व देशांसह भारतामध्ये देखील विक्रीसाठी उपलब्ध होईल, (Kia Tasman Price in India) याची किंमत साधारणता 40 ते 45 लाखांच्या घरात असण्याची अपेक्षा आहे. तुम्ही शेतकरी, बांधकाम कामगार किंवा छोटे व्यवसायिक असाल तरी, किआ टॅस्मन तुमच्या दररोजच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. जागतिक पातळीवर ही ट्रक लाँच होत असल्याने, भारतातही लवकरच याचा लाभ घेता येईल, अशी आशा आहे.तुम्हाला किआ टॅस्मनबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांसोबत हा लेख शेअर करा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top